पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, मर्या. शेगाव
नोंदणी क्रमांक : ९५३ जि. बुलढाणा
- संस्थेचे उपक्रम-
" संस्थेने सहकार क्षेत्रात काम करताना नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेने शासनाच्या वृक्ष संवर्धन योजनेत झाडे लावली व त्यांची संगोपनाची संपूर्ण जबाबदारी देखील यशस्वीरीत्या पार पाडली. कारगिल निधी, भूकंप निधी, पूरग्रस्त निधी व कोविड निधी अशा देशातील विविध आपत्तीमध्ये उदार हस्ते देशवासीयांची मदत केली आहे."


" खेडेगावातून दर्जेदार खेळाडू घडले पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरीत होऊन शेगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा

परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने संस्था दरवर्षी बक्षीस वितरण करीत आली आहे. "

" संस्था वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचे सेवानिवृत्त झालेले शिक्षक सभासद यांचा सत्कार व सभासदांच्या

गुणवंत पाल्यांचा गुणगौरव तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व नवोदय पात्र विद्यार्थी यांचा उत्साह द्विगुणित करण्याकरता त्यांचा गुणगौरव करीत आहे. "

स्त्री शक्ती चा सन्मान व्हावा यासाठी जागतिक महिला दिनी संस्थेने शेगाव परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला आहे. तसेच स्त्रियांना सहकार क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळावा यासाठी संस्थेच्या पदाधिकारी म्हणून महिला भगिनी यशस्वीरीत्या काम सांभाळत आहेत.
* संपर्क *
+91-97657 30133
+91-82753 29798
ptccss953@gmail.com