विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज यांच्या पावनभूमीत स्वर्गीय श्री भास्करराव लक्ष्मण पल्हाडे गुरुजी यांच्या
संकल्पनेतून पंचायत समिती शेगावच्या अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांच्या सहकार्याने दिनांक 21 ऑक्टोबर 1994 रोजी
पंचायत समिती प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था शेगाव रजिस्टर नंबर 953 या संस्थेची स्थापना करण्यात आली....
शेगाव
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे अस्तित्व निर्माण करण्याचा व प्राथमिक शिक्षकांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान
उंचावण्याच्या दृष्टीने आर्थिक समृद्धीची गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने तथा प्राथमिक शिक्षकांचे कामे जलद
गतीने
होण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून पतसंस्थेची स्थापना करण्यात आली........
सन 1994 पासून सुरु झालेल्या पतसंस्थेच्या प्रवासात अनेक चढउतार आलेत. अनेक अडचणी आल्यात त्यावर मात करुन प्रबळ
इच्छाशक्ती, कठोर परिश्रम व सांघिक योगदानामुळे संस्था स्वबळावर आणून स्व निधीतून अल्प व्याज दराने शिक्षकांच्या
आर्थिक गरजा पूर्ण करीत आहे.....
प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रम आणि सांघिक भावनेतून सहकार चळवळीत दीपस्तंभ म्हणून संस्था कार्यरत आहे...
संघटनेच्या
व्यापक वाटचालीत अनेकांचे योगदान आहे....
त्यामध्ये मुख्यतः संस्थेला प्रगतीपथावर नेण्यास सक्षम असलेले
संचालक
मंडळ
संस्थेच्या प्रगतीचा कणा आहे...
1994 मध्ये सुरू झालेली पतसंस्था आता नव्या वळणावर पोहोचलेली आहे डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून आमचे संस्था
अत्याधुनिक सेवा पुरविण्यात अग्रेसर आहे या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे .